श्रीरामपूर तालुक्यात 194 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

13 करोनाबाधित; 39 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 194 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 13 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 194 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 39 होती.

जिल्हा रुग्णालयात 00, खासगी रुग्णालयात 12 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 01 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 15466 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 14728 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरात- वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 7-02 असे 03 तर ग्रामीण भागात उक्कलगाव-02, कडीत बुद्रुक-01, पढेगाव-01, भेर्डापूर-01, उंबरगाव-01, टाकळीभान-01, दत्तनगर-01, असे एकूण 08 रुग्ण आढळून आले आहेत.

काल शहरात 03 करोनाबाधित रुग्ण तर ग्रामीण भागात 08 रुग्ण असे 11 रुग्ण आढळून आले. यात अन्य तालुक्यातील तसेच मोबाईल नंबर चुकलेले तसेच चुकीचे नाव दिलेले असे 02 रुग्ण असून असे एकूण 13 रुग्ण आढळून आले आहेत.

आज कोविशिल्डचे लसीकरण

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणारे आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्र, श्रीरामपूर येथे आज मंगळवार दि. 22 जून 2021 रोजी कोविशिल्ड या लसीचा पहिल्या व दुसर्‍या डोससाठी लसीकरण सत्र आयोजित असून लसीकरणासाठी पात्र लाभार्थी यांनी आज सकाळी 09:00 वाजता यावे. 45 वयाच्या पुढील लोकांना पहिला डोस देण्यात येणार आहे. तसेच 18 ते 44 व त्यापुढील वयाच्या नागरिकांसाठी कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. वरील पैकी श्रीरामपूर तालुक्यातील असलेल्या नागरिकांनाच प्राधन्याने लसीकरण केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com