श्रीरामपुरात 10 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपुरात 10 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 10 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात

काल रॅपीड तपासणी करण्यात आली नाही. खासगीत 05 तर अन्य रॅपीड टेस्टमध्ये 5 असे 10 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत करोनाबाधितांचा आकडा 2759 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल एकूण 07 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 15 जण उपचार घेत आहेत. 1 रुग्णांस दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात काल 55 जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले.त्याचे अहवाल उद्यापर्यंत मिळणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com