श्रीरामपूर तालुक्यात 166 जणांना डिस्चार्ज

51 करोनाबाधित रुग्ण; 749 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह
श्रीरामपूर तालुक्यात 166 जणांना डिस्चार्ज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 51 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 749 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 164 होती.

जिल्हा रुग्णालयात 02, खासगी रुग्णालयात 30 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 19 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 14947 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 14078 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल करोनाबाधितांची संख्या पुन्हा कमी झाल्याने दिलासा मिळाला. तर बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्या जास्त झाल्याने अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असून ती 749 झाली आहे. हे रुग्ण श्रीरामपूर, जिल्हा तसेच जिल्हाबाहेरील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज लसीकरण बंद

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणार्‍या श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्रावर आज रविवार दि. 06 जून 2021 रोजी लसीकरण बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरीच थांबावे. विचारपूस करण्यास लसीकरण केंद्रावर जाऊ नये. पुढील नियोजित लसीकरण सत्राची माहिती व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर देण्यात येईल, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com