श्रीरामपूर तालुक्यात 258 जणांना डिस्चार्ज

144 नवीन करोनाबाधित रुग्ण; 1373 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह
श्रीरामपूर तालुक्यात 258 जणांना डिस्चार्ज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल तालुक्यात 144 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 1373 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 258 होती.

जिल्हा रुग्णालयात 04 खासगी रुग्णालयात 75 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 65 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 13192 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 11621 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरातील वॉर्ड नं. 1-19, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 6-04 तर वॉर्ड नं. 7-11 असे शहरात 35 रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-08, ऐनतपूर-01, बेलापूर खुर्द-01, नरसाळी-01, उक्कलगाव-05, गळनिंब-04, फत्याबाद-01, पढेगाव-03, लाडगाव-02, कान्हेगाव-01, भेर्डापूर-06, कारेगाव-05, मातापूर-02, उंबरगाव-02, टाकळीभान-06, उंदिरगाव-12,ब्राम्हणगाव-01, हरेगाव-03, माळेवाडी-07, गोंधवणी-03, दत्तनगर-04, खंडाळा-02, शिरसगाव-05, ऱामपूर-02, गोंडेगाव-02 खोकर-02, वडाळा महादेव-02, अशोकनगर-06, असे 102 करोनाबाधित रुग्ण आहेत.

शहरात एकूण 35 ग्रामीण 102 तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 07 रुग्ण असून असे एकूण 144 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com