श्रीरामपूर तालुक्यात 225 रुग्ण बरे होवून घरी परतले

श्रीरामपूर तालुक्यात 225 रुग्ण बरे होवून घरी परतले

144 करोनाबाधित रुग्ण; 1121 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 114 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या काल 225 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.

काल 114 रुग्ण सापडले आहे. तर 1121 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 225 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 26 खासगी रुग्णालयात 83 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 35 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 225 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 1121 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 5910 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 3703 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1121 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

काल शहरात 65 तर ग्रामीण भागात 65 अन्य 14 असे 114 रुग्ण आहेत. यात शहरात वॉर्ड नं. 1-16, वॉर्ड नं. 2-03, वॉर्ड नं. 3-07, वॉर्ड नं. 4-02, वॉर्ड नं. 6-06, वॉर्ड नं. 07-31 असे 65 तर ग्रामीण भागात मालुंजा-01, भोकर-02, निपाणीवडगाव-02, मातापूर-03, माळवाडगाव-03, उक्कलगाव-02, दिघी-03, गोंधवणी-02, टाकळीभान-01, उंदिरगाव-02, हरेगाव-07, माळेवाडी-01, वळदगाव-02, शिरसगाव-04, फत्याबाद-01, मांडवे-04ल बेलापूर-05, कारेगाव-03, कान्हेगाव-03, पढेगाव-01, भैरवनाथनगर-01, कमालपूर-04, खंडाळा-03, गळनिंब-01, लाडगाव-01, निमगाव खैरी-01, दत्तनगर-01, मठेवाडगाव-01 असे 65 तर बाहेर तालुक्यातील तसेच मोबाईल नंबर व पत्ता चुकीचे दिलेले असे एकूण 07 रुग्ण आहेत. तालुक्याबाहेरील तसेच ज्यांचे पत्ते व फोन नंबर नाही असे एकूण 14 रुग्ण असे मिळून 144 रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com