श्रीरामपूर तालुक्यात 235 करोनाबाधित रुग्ण

165 जणांना डिस्चार्ज; 1640 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह
श्रीरामपूर तालुक्यात 235 करोनाबाधित रुग्ण
करोना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 235 नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 1640 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 165 होती.

जिल्हा रुग्णालयात 0, खासगी प्रयोगशाळा 187 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 48 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 14213 रुग्णांना करोनाची लागण झाली.त्यातील सुमारे 12573 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरातील वॉर्ड नं. 1-18, वॉर्ड नं. 2-02, वॉर्ड नं. 3-07, वॉर्ड नं. 6-04 तर वॉर्ड नं. 7-12 असे शहरात 43 रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात बेलापूर-09 बेलापूर खुर्द-06, नरसाळी-03, उक्कलगाव-03, गळनिंब-02, फत्याबाद- 02, पढेगाव-04, मालुंजा-01, लाडगाव-10, कान्हेगाव-03, मातापूर-002 उंबरगाव-02, भेर्डापूर-08, कारेगाव-22, वळदगाव- 04, टाकळीभान-06, कमालपूर- 01, खिर्डी-01, वांगी खुर्द-01, उंदिरगाव-04, हरेगाव-02, माळेवाडी-18, महांकाळवाडगाव-02, निमगाव खैरी-01, दिघी-01, गोंधवणी-10, दत्तनगर-09, खंडाळा-01, शिरसगाव-10, नायगाव-01, रामपूर-01, माळवाडगाव-06, भामाठाण-04, मुठेवाडगाव-03, वडाळामहादेव-02, निपाणीवडगाव-04, अशोकनगर-06 असे एकूण 175 रुग्ण आहेत.

शहरात एकूण 43 ग्रामीण 175 तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 17 रुग्ण असून असे एकूण 235 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणारे आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्र, श्रीरामपूर येथे आज दि. 27 मे 2021 रोजी 45 पेक्षा जास्त वय व कोव्हॅक्सीन या लसीच्या दुसर्‍या 120 डोससाठी लसीकरण सत्र होणार आहे. या सत्रासाठी ज्या पात्र लाभार्थ्यांना नगरपालिका श्रीरामपूर यांच्याकडून यादीप्रमाणे फोन गेलेला आहे, अशाच नागरिकांनी लसीकरणासाठी यावे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com