श्रीरामपूर तालुक्यात 390 जणांना डिस्चार्ज

श्रीरामपूर तालुक्यात 390 जणांना डिस्चार्ज

148 करोनाबाधितांची भर; 1131 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 148 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कालपर्यंत 1131 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 390 होती.

जिल्हा रुग्णालयात 42 खासगी रुग्णालयात 59 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 47 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 13342 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 12011 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरातील वॉर्ड नं. 1-05, वॉर्ड नं. 2-03, वॉर्ड नं. 3-03, वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 5-01 तर वॉर्ड नं. 7-11 असे शहरात 25 रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-25, ऐनतपूर-02, नरसाळी-01, एक़लहरे-01, उक्कलगाव-16, गळनिंब-03, फत्याबाद-01, पढेगाव-04, मालुंजा-01, लाडगाव-01, भेर्डापूर-01, कारेगाव-05, वळदगाव-01, टाकळीभान-04, भोकर-02, उंदिरगाव-04, हरेगाव-01, माळेवाडी-07, निमगाव खैरी-01, गोंधवणी-02, दत्तनगर-04, खंडाळा-01, शिरसगाव-07, गोंडेगाव-06 माळवाडगाव-03, मुठेवाडगाव-01, वडाळा महादेव-02, निपाणीवडगाव-03, अशोकनगर-02, असे 112 करोनाबाधित रुग्ण आहेत.

शहरात एकूण 25 ग्रामीण 112 तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 11 रुग्ण असून असे एकूण 148 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज लसीकरण बंद

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणार्‍या श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्रावर येथे आज रविवार दि. 23 मे 2021 रोजी लसीकरण बंद राहील. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधिक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com