श्रीरामपूर तालुक्यात 264 करोनाबाधित रुग्ण

1369 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण; आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू
श्रीरामपूर तालुक्यात 264 करोनाबाधित रुग्ण
करोना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल नवीन 264 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 1369 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालयात 119 खासगी रुग्णालयात 71 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 74 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 11899 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 10411 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 119 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

काल आढळलेल्या करोनाबाधीत रुग्णामध्ये शहरातील वॉर्ड नं. 1-22, वॉर्ड नं. 2-06 वॉर्ड नं. 3-02, वॉर्ड नं. 5-01, वॉर्ड नं. 6-10 तर वॉर्ड नं. 7-19 असे शहरात 60 तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-10, ऐनतपूर-04, एकलहरे-01, उक्कलगाव-08, गळनिंब-04, नुरणपूर-04, फत्याबाद-01, कडीत बुद्रुक-01, पढेगाव-10, मालुंजा-03, लाडगाव-01, भेर्डापूर-08, कारेगाव-03, मातापूर-03, उंबरगाव-05, वळदगाव-01, टाकळीभान-05, भोकर-04, उंदिरगाव-01, ब्राम्हणगाव-02, हरेगाव-05, माळेवाडी-14, गोवर्धन-02, महांकाळवाडगाव-01, निमगाव खैरी-03, दिघी-01, गोंधवणी-07, दत्तनगर-03, खंडाळा-02, शिरसगाव-13, गोंडेगाव-03, माळवाडगाव-09, भामाठाण-13, खोकर-05, मुठेवाडगाव-04, वडाळा महादेव-09,निपाणीवडगाव-01, अशोकनगर-01, असे 176 करोनाबाधित रुग्ण आहेत.

तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 28 रुग्ण असून असे एकूण 264 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज लसीकरण बंद

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणार्‍या श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्रावर येथे आज शनिवार दि. 15 मे 2021 रोजी लसीकरण बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरीच थांबावे. विचारपूस करण्यास लसीकरण केंद्रावर जावू नये. पुढील नियोजित लसीकरण सत्राची माहिती ग्रुप वर देण्यात येईल, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधिक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.

श्रीरामपूरात 13 मे रोजी 122 रेमडेसिवीर इंजेक्शन प्राप्त

श्रीरामपूर शहरात गुरुवार दि. 13 मे 2021 रोजी रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा प्राप्त झाला असून अधिकृत मेडिकल एजन्सीला 122 रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले आहेत. यात श्रीरामपूरातील औषधालय मेडिकल अँड जनरल स्टोअर्सला श्रीरामपूरचे कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर यांच्या अधिपत्याखाली 32 इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. तसेच मोरगे हॉस्पीटल अँड जनरल स्टोअर्सला मोरगे हॉस्पिटलच्या अधिपत्याखली 54 रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले आहेत. युनिटी मेडिकल अँड जनरल स्टोअर्सला युनिटी हॉस्पिटल यांच्या अधिपत्याखाली 36 असे एकूण 122 रेमडेसिवीर इंजेक्शन श्रीरामपूर तालुक्यात 13 मे रोजी प्राप्त झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com