श्रीरामपूर तालुक्यात काल 174 रुग्ण बरे होऊन घरी

110 करोनाबाधित रुग्ण; 960 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह
श्रीरामपूर तालुक्यात काल 174 रुग्ण बरे होऊन घरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 118 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या काल 225 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.

काल 118 रुग्ण सापडले आहे. तर 960 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 174 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत. जिल्हा रुग्णालयात 35 खासगी रुग्णालयात 62 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 13 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 174 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 960 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 6138 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 4102 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 960 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

सध्या श्रीरामपूर तालुक्यात बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्यी वाढली आहे. तसेच करोना बाधित रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यात दिलासादायक वातावरण असले तरी अनेक भागात अँटीजन चाचणी होत नसल्यामुळे करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. अँटीजन चाचणीचे किट नसल्यामुळे अनेक ठिकाणी अँटीजन चाचणी होत नसल्यामुळे रुग्ण कमी होण्याचे प्रमाण घटले आहे. सध्या तपासणी वाढली पाहिजे. कोविड सेंटरमध्ये अ‍ॅटीजन चाचणीचे किट उपलब्ध झाल्यास करोनाच्या चाचण्या तातडीने होवून करोनाबाधितांचे चित्र समोर येवू शकेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com