श्रीरामपूर तालुक्यात करोनाचा कहर; 229 करोनाबाधित रुग्ण
करोना

श्रीरामपूर तालुक्यात करोनाचा कहर; 229 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा करोनाचा कहर झाला असून काल तालुक्यात 229 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

मात्र बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्या काल 200 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.

काल 229 रुग्ण सापडले आहेत. तर 1064 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 200 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 82 खासगी रुग्णालयात 53 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 94 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 200 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 1064 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 4825 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 2675 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1064 रुग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

काल शहरात 92 तर ग्रामीण भागात 108 अन्य 29 असे 229 रुग्ण आहेत. यात शहरात वॉर्ड नं. 1-24, वॉर्ड वॉर्ड नं. 2-03, वॉर्ड नं. 3-07, वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 6-20, वॉर्ड नं. 07-37 तर ग्रामीण भागात गळनिंब-01, कान्हेगाव-01, वडाळा महादेव-07, निमगाव खैरी-02, पढेगाव-06, उंबरगाव - 04, मातापूर-08, गोंडेगाव-06, बेलापूर-07, गोंधवणी-07, मालुंजा-04, उक्कलगाव-04, महांकाळवाडगाव-02, पाचवाडी-01, टाकळीभान-01, माळवाडगाव-02, ऐनतपूर-01, मुठेवाडगाव-02, दत्तनगर-06, खंडाळा-05, शिरसगाव-06,कारेगाव-04, निपाणीवडगाव-04, फत्याबाद-01, हरेगाव-04, खिर्डी-02, उंदिरगाव-05, वळदगाव-02, भोकर-01, ब्राम्हणगाव वेताळ-01, मातुलठाण-01, एकूण 108 तर बाहेर तालुक्यातील तसेच मोबाईल नंबर व पत्ता चुकीचे दिलेले असे एकूण 29 रुग्ण आहेत.

संचारबंदी असूनही मोकाट फिरणारे व चौकात गप्पा मारणार्‍यांवर वचकच नाही

करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. संचारबंदीचे उल्लंघन केल्यास संबंधित नागरिकांवर कठोर केली जाणार आहे. असे पोलीस सांगत असले तरी सकाळी 11 वाजता दुकाने बंद झाल्यानंतर रस्त्यावरफिरणार्‍यांची संख्या खूप आहे. विनाकारण ठिकठिकाणी पाच-पाच सहा-सहा जण गप्पा मारत असतात. परंतु त्यांना कोणीच अडवत नाही. पोलीस गाडी शेजारून गेली तरी घाबरत नाही. पोलिसांचा वचकच राहिला नाही असे यावरून दिसून येते. करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्याची वेळ ओढवली आहे. संचारबंदीमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी शहरासह तालुक्यातील प्रमुख चौक व महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणी काहीवेळेस पोलीस थांबतात नंतर ते निघून जातात. त्यामुळे फिरणारे व गप्पा मारणारे बिनधास्तपणे कोणतीही धास्ती न बाळगता थांबून असतात. त्यामुळे अशा लोकांना आळा घातला तरच पूर्ण लॉकडाऊन होऊ शकेल. नाहीतर असे कितीही लॉकडाऊन केले तर काहीच फरक पडणार नाही हे मात्र निश्चित !

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com