श्रीरामपूर तालुक्यात 182 जणांना डिस्चार्ज

95 नवीन करोनाबाधित ; 1359 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह
श्रीरामपूर तालुक्यात 182 जणांना डिस्चार्ज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल तालुक्यात 95 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 1359 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 182 होती.

जिल्हा रुग्णालयात 01 खासगी रुग्णालयात 41 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 53 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 14318 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 12755 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरातील वॉर्ड नं. 1-07, वॉर्ड नं. 2-02, वॉर्ड नं. 3-01, वॉर्ड नं. 6-01 तर वॉर्ड नं. 7-07 असे शहरात 43 रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात बेलापूर-15, उक्कलगाव-02, गळनिंब-02, पढेगाव-03, लाडगाव-01, मातापूर-05 भेर्डापूर-05, कारेगाव-02, उंबरगाव-01 टाकळीभान-02, भोकर-03, खिर्डी-01, निमगाव खैरी-03, गोंधवणी-02, दत्तनगर-02, खंडाळा-01, शिरसगाव-01, माळवाडगाव-01, वडाळामहादेव-01 निपाणीवडगाव-01, अशोकनगर-02 असे एकूण 56 रुग्ण आहेत.

शहरात एकूण 18 ग्रामीण 56 तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 21 रुग्ण असून असे एकूण 95करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

काल करोनाबाधितांची संख्या पुन्हा कमी झाल्याने दिलासा मिळाला. तर बरे होवूनघरी जाणार्‍यांची संख्या वाढली असल्याने अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 1359 वर जावून पोहोचली आहे.

आज लसीकरण सुरु

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणारे आगाशे हॉल,आझाद मैदान लसीकरण केंद्र, श्रीरामपूर येथे आज शुक्रवार दि. 28 मे 2021 रोजी कोविशिल्ड या लससाठी लसीकरण सत्र आयोजित असून खालील प्रमाणे लसीकरण साठी पात्र लाभार्थी ह्यांनी उद्या सकाळी 09:00 वाजता यावे. आरोग्य विभाग (HE­LTH C­RE WORKERS) आणि फ्रंट लाईन यांच्या दुसर्‍या डोस साठीचे सत्र आयोजित असून सदर दुसर्‍या डोससाठी ज्यांना नगरपालिका श्रीरामपूर ह्यांच्याकडून फोनद्वारे संपर्क साधला गेलेला आहे त्यांनीच लसीकरणसाठी यावे. ज्या नागरिकांचे वय 45 किंवा त्यापेक्षा जास्त आहे व नगरपालिका श्रीरामपूर त्याांच्याकडून लससाठी फोन गेलेला आहे अशा पात्र लाभार्थ्यांचे पहिल्या डोससाठीचे कोविशिल्ड या लससाठी लसीकरण सत्र आयोजित आहे. हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी लसीकरणला येताना पहिल्या डोस साठी दिलेला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड किंवा पहिल्या डोस च्या वेळेस दिलेले ओळखपत्र जवळ बाळगावे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com