श्रीरामपूर तालुक्यात 163 जणांना डिस्चार्ज

90 करोनाबाधित रुग्ण; 1054 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह
श्रीरामपूर तालुक्यात 163 जणांना डिस्चार्ज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 90 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कालअखेर 1054 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 163 होती.

जिल्हा रुग्णालयात 06 खासगी रुग्णालयात 37 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 47 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 13432 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 12174 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरातील वॉर्ड नं. 1-10, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 3-01, वॉर्ड नं. 5-02, वॉर्ड नं. 6-02 तर वॉर्ड नं. 7-03 असे शहरात 24 रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात उक्कलगाव-03, पढेगाव-03, गळनिंब-01, टाकळीभान-03, भेर्डापूर-01,बेलापूर-04, खंडाळा-01, वडाळा महादेव-01, शिरसगाव-06, कुरणपूर-02, निमगाव खैरी-02, दत्तनगर-06, कारेगाव-02, माळवाडगाव-01, हरेगाव-03, उंबरगाव-01, उंदिरगाव-04, गोंडेगाव-01, कडीत-01, माळेवाडी-05, मालुंजा-03, कमालपूर-01, असे एकूण 55 रुग्ण आढळून आले आहेत.

शहरात एकूण 24 ग्रामीण 55 तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 11 रुग्ण असून असे एकूण 90 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज तालुक्यात केवळ 90 रुग्ण आढळून आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असल्याने हा परिणाम जाणवत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरेाबर करोनाबाधित रुग्ण बरे होऊन गेलेल्यांची संख्याही चांगली असल्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे काही कोविड केअर सेंटर व रुग्णालयांमध्ये जी गर्दी झाली होती ती आता खूपच कमी झाली आहे.

आज लसीकरण सुरू

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणारे आगाशे हॉल,आझाद मैदान लसीकरण केंद्र, श्रीरामपूर येथे आज सोमवार दि. 24 मे 2021 रोजी कोव्हॅक्सीन या लससाठी लसीकरण सत्र आयोजित असून खालील प्रमाणे लसीकरणासाठी पात्र लाभार्थी यांनी आज सकाळी 9 वाजता यावे. आरोग्य विभाग (HE­LTH C­RE WORKERS) आणि फ्रंट लाईन WORKERSयांच्या दुसर्‍या डोससाठीचे सत्र आयोजित असून सदर दुसर्‍या डोससाठी ज्यांना नगरपालिका श्रीरामपूर यांच्याकडून फोनद्वारे संपर्क साधला गेलेला आहे त्यांनीच लसीकरणासाठी यावे. ज्या नागरिकांचे वय 45 किंवा त्यापेक्षा जास्त आहे व नगरपालिका श्रीरामपूर यांच्याकडून लससाठी फोन गेलेला आहे अशा पात्र लाभार्थ्यांचे पहिल्या डोस साठीचे कोविशिल्ड या लससाठी लसीकरण सत्र आयोजित आहे. उर्वरित ज्यांना संपर्क साधला गेला नसेल अशा नागरिकांनी लसीकरण सत्र ठिकाणी गर्दी करू नये अथवा वाद घालू नये. उर्वरित नागरिकांना पात्र लाभार्थी क्रमानुसार पुढील आयोजित लसीकरण सत्रासाठी अशाच प्रकारे संपर्क केला जाईल. हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर ह्यांनी लसीकरणला येताना पहिल्या डोससाठी दिलेला मोबाईल नंबर आणि आधारकार्ड किंवा पहिल्या डोस या वेळेस दिलेले ओळखपत्र जवळ बाळगावे. अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही. ज्यांनी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांनी या सत्रास दुसर्‍या डोससाठी येऊ नये. लस घ्यायला येताना उपाशी पोटी येवू नये. जेवण अथवा नाश्ता करूनच यावे.सोबत भरलेली पिण्याच्या पाण्याची बाटली बाळगावी. पहिल्या डोसच्या वेळेस ज्यांना कोणाला लर्जीचा त्रास जाणवला असल्यास त्यांनी दुसरा डोस घेताना सत्र अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com