श्रीरामपूरच्या ठेकेदारावर कारवाईसाठी नगरमध्ये घंटानाद

कामे न करता बिल काढल्याचा आरोप
श्रीरामपूरच्या ठेकेदारावर कारवाईसाठी नगरमध्ये घंटानाद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

श्रीरामपूर नगर परिषदेने प्रभाग 11 मधील अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा अंतर्गत गहिवार ते सय्यद यांच्या घरापर्यंत पेविंग ब्लॉक बसवण्याचे काम ठेकेदार याने न करताच कामाची बिल काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विरोधात जरीया फाउंडेशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घटानांद आंदोलन करण्यात आले.

या प्रकरणात नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे संबंधित जबाबदार अधिकारी, तसेच ठेकेदार यांना पाठीशी घालत आहे. या कामाची सखोल चौकशी करून दोषी असणारे अधिकारी, नगर अभियंता यांना सेवेतून काढत ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जरीया फाउंडेशनच्यावतीने करण्यात आली. यासाठी नगरला घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष इमरान शेख, संजय हिवराळे, सद्दाम कुरेशी, शाहरूख कुरेशी, महेफुज खान, मजीद खान, गणेश शेवाळे, मोबीन बागवान, जावेद कुरेशी, अबीद बागवान, अनिस मलंग, शाहरूख सय्यद, अबुजर शेख, आरिफ कुरेशी, अयान आतार, बाबा शेख, शुभम जाधव, तन्वीर शेख, समीर शेख, शोयब शेख आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com