श्रीरामपूर मतदारसंघातील रस्त्यांसाठी 5 कोटींचा निधी मंजूर- आ. कानडे

श्रीरामपूर मतदारसंघातील रस्त्यांसाठी 
5 कोटींचा निधी मंजूर- आ. कानडे
आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 5 कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. लहू कानडे यांनी दिली.

सन.2021-22 या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष 2515-1238) या योजनेअंतर्गत श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची कामे करण्यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये मौजे खंडाळा येथील संगमनेर रोड ते ग्रामदैवत म्हसोबा मंदिर येथील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (25 लक्ष), गोवर्धन ते रामपूर रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे (15 लक्ष), नाऊर ते रामपूर ग्रामा-26 रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (20 लक्ष), नाऊर येथील गोपीनाथ शिंदे वस्ती रस्ता ते साईखेडकर गंगा जुना रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (20 लक्ष), फत्याबाद ते बाबा आठरे वस्ती ते चांदेवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (30 लक्ष), शिरसगावा अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (85 लक्ष), दत्तनगर येथील हॉटेल आर्या ते डी. पॉल इंग्लिश मिडीयम स्कुल रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (10 लक्ष), सूतगिरणी फाटा ते रेल्वे गेटपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (15 लक्ष), वडाळा-महादेव ते क्रशर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (30 लक्ष), भैरवनाथनगर मौलाईचा मळा ते तुपे वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (30 लक्ष), मौजे गळनिंब ते चारी न. 4 येथील पगारे वस्ती, भागवत वस्ती, बाचकर वस्ती, शिंदे वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (35 लक्ष), महांकाळ वाडगाव ते सरला निघुट वस्ती पर्यंतचा रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे (20 लक्ष), वडाळा महादेव ते निपाणी वडगांव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (20 लक्ष), अशोकनगर, निपाणी वडगांव अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (20 लक्ष), कारेगाव अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (30 लक्ष), पढेगाव जुना गावठाण ते बोधेगाव पद्मावती नदीपर्यंतचा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (30 लक्ष), खंडाळा येथील रांजणखोल मोरी ते खंडाळा पूल श्रीरामपूर हद्दीत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (15 लक्ष), राहुरी तालुक्यातील मुसळवाडी अमरधाम ते इंगळे वस्ती रस्ता मजबुतीकरण करणे (40 लक्ष), चांदेगाव येथील बेलापूर रस्ता (महाडिक डॉक्टर) ते चांदेगाव मुख्य रस्ता मजबुतीकरण करणे (10लक्ष) अशा प्रकारे श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यातील 32 गावआंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले.

येणार्‍या काळात मतदारसंघातील सर्वच रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही आ. कानडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.