श्रीरामपूर मतदारसंघात रविवारी नोकरी महोत्सवाचे आयोजन

श्रीरामपूर मतदारसंघात रविवारी नोकरी महोत्सवाचे आयोजन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आ. लहू कानडे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील तरुण तरुणींच्या रोजगाराचा विषय हाती घेऊन श्रीरामपूर येथे प्रथमच रविवार दि. 26 जून 2022 रोजी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. मतदारसंघातील तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या उद्देशाने या नोकरी महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती अशोक कानडे यांनी दिली.

सदर नोकरी महोत्सवासाठी राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे, तर आ. डॉ. सुधीर तांबे व सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सदर महोत्सवासाठी राज्यभरातील तब्बल पन्नासपेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचे व्यवस्थापक तसेच एच.आर. मॅनेजर उमेदवारांच्या निवडी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व मुलाखतीतून करणार आहेत व पात्र उमेदवारांना जागेवरच मान्यवरांच्या हस्ते ‘ऑफर लेटर’ देण्यात येणार आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी यशोधन आमदार कार्यालय, बेलापूर रोड, श्रीरामपूर येथे समक्ष येऊन नाव नोंदणी करता येईल. यासाठी जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगारांनी या संधीचा लाभ घेऊन रविवार दि. 26 जून 2022 रोजी सकाळी 9 वाजता लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालय, नेवासा रोड, लॉ कॉलेज मागे, श्रीरामपूर येथे उपस्थित राहावे, असेही आवाहन कानडे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com