
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेने ईडी चौकशीच्या कारवाई विरोधात आ. लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
यावेळी आ. कानडे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारला देशातील गोरगरीब माणसांचे, शेतकर्यांचे, कष्टकरी माणसांचे प्रश्न सोडविण्यात अपयश येत आहे, म्हणून सामान्य जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भाजपाचे सरकार जातीधर्माचे राजकारण करुन समाजासमाजात दुही पेरण्याचे विषारी राजकारण करत आहे. या प्रश्नावर देशभर काँग्रेस पक्ष आवाज उठवतो आहे, त्याचा आवाज बंद करण्यासाठी सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग अशा अनेक माध्यमातून विनाकारण केंद्र सरकार कारवायांचे सुडचक्र करत आहेत.
आता तर धान्य व दूध, दही, ताक यासारख्या जीवनाश्यक वस्तुंवर त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य वही, पुस्तक, पाटी पेन्सील यासारख्या शालेय वस्तुंवर देखील जीएसटी लावणारे केंद्रातील पहिले निष्क्रीय सरकार आहे. देशाच्या विकासाला हातभार लावणारे अनेक उद्योग भाजपा प्रणित केंद्र सरकारने मोडित काढले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणीत मोलाचे योगदान देणार्या गांधी कुटुंबाला सूडबुद्धीने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक यांनी केली. अॅड. समीन बागवान यांनी प्रास्तविक केले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रनाथ पा. थोरात, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, अंजुमभाई शेख, अशोक नाना कानडे, बाबासाहेब कोळसे, मुक्तार शहा, कलीम कुरेशी, विजय शेळके, जयश्री शेळके, सतीश बोर्डे, आबा पवार, सुरेश पवार, हरिभाऊ बनसोडे, बाळासाहेब तनपुरे, अक्षय नाईक, नानासाहेब रेवाळे, मच्छींद्र मासाळ, आशिष शिंदे, मुदस्सर शेख, अण्णासाहेब ढोणे, राधाकृष्ण तांबे, मेहबूब शेख, अभिजीत लिप्टे, अहमद शाह, जावेद शेख, मुळा प्रवराचे माजी संचालक अशोक बागुल, विजय शेलार, इम्रान शेख, बाबा भालेराव, विशाल शिरसाठ, आकाश शेंडे, आकाश अडांगळे, संतोष निकम, हारुण शेख यांच्यासह काँग्रेसच्या सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.