<p><strong>श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur</strong></p><p>श्रीरामपूर शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्षपदी सरबजितसिंग गुरुबच्चनसिंग चुग यांची एकमताने निवड करण्यात आली. </p>.<p>सरबजितसिंग चुग यांची अल्पसंख्याक समाजातील अनेकांबरोबर असलेला स्नेह व सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्यांची निवड करण्यात आली असल्याचे निवडीचे पत्र आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, काँग्रेस अल्पसंख्याक अहमदनगर विभागाचे अध्यक्ष अनिसभाई शेख, दीपक कदम आदींच्या हस्ते देण्यात आले. सरबजीतसिंग चुग यांच्या निवडीबद्दल शहरातील अनेक मान्यवरांनी व समाजातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.</p>