श्रीरामपूर |वार्ताहर| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांनी दिवाळी पाडव्याला व्यापारी बांधवांना शुभेच्छा

देण्याची परंपरा सुरु केली तीच परंपरा जपत काँग्रेस कमिटीने आमदार लहू कानडे आणि प्रदेश युवक काँग्रेस महासचिव उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहरांतील व्यापारी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून स्व.ससाणे यांनी दिवाळी पाडव्याला व्यापारी बांधवांना शुभेच्छा देण्याची परंपरा सुरु केली होती आमदार कानडे, आणि करण ससाणे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील मुख्य रस्त्यावरील व्यापारी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फड, जेष्ठ नगरसेवक दिलीप नागरे, रितेश रोटे, आशिष धनवटे, पुरुषोत्तम मुळे, जिल्हा काँग्रेसचे सुभाष तोरणे, समीन बागवान, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धार्थ फड, दिपक कदम, सुहास परदेशी, रावसाहेब आल्हाट, सरबजीतसिंग चुग, मिथुन शेळके, कृष्णा पुंड, सुरेश ठुबे, रितेश एडके, आशिष मोरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.