श्रीरामपूर : महागाईच्या विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

श्रीरामपूर : महागाईच्या विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

इंधन दरवाढ आणि जीवनाश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात काँग्रेस पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन सुरू असून या आंदोलनाच्या अनुषंगाने श्रीरामपूर येथे आ. लहू कानडे तसेच श्रीरामपूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारच्या महागाईच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

या आंदोलनात आ. लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, ज्येेष्ठ काँग्रेस नेते इंद्रभान थोरात, सचिन गुजर, संजय फंड, अरुण नाईक, संजय छल्लारे, मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, शशांक रासकर, बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, राजेंद्र पाऊलबुधे, रमेश कोठारी, सतीष बोर्डे, अशोक पवार, सुधीर नवले, अभिजीत लिप्टे, सुभाष तोरणे, रितेश रोटे,विजय बोर्डे आदी सहभागी झाले होते.

यावेळी आ. लहू कानडे म्हणाले, युपीएचे डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना जगभरात कच्चा तेलाच्या किमती आभाळाला भिडलेल्या असतानाही देशभरातील पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती नियंत्रणात होत्या. तथापि पंतप्रधान मोदी सरकारच्या काळात इंधनाचे दर वाढले आहेत. देशावर करोनाचे संकट असताना केंद्र सरकारकडून जनतेला पुरेसा औषध, ऑक्सीजन पुरवठा झाला नाही, त्यात गॅसच्या किमती वाढवत इंधनावरील टॅक्स वाढवून सर्वसामान्यांची लूट केली आहे. एका बाजूला सर्वसामान्य जनतेचे जगणे महाग केले तर दुसर्‍या बाजुला गरीब शेतकर्‍यांच्या जमिनी भांडवलदारांना मिळाव्यात म्हणून शेतकरीविरोधी कायदे केले. अशाप्रकारे जनतेची मोठी फसवणूक सुरू आहे. भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी, कामगार विरोधी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधातले सरकार आहे, याची जाणीव त्यांना करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी करण ससाणे, सचिन गुजर, इंद्रभान थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण नाईक, संजय छल्लारे, अभिजीत लिप्टे यांची निषेधपर भाषणे झाली. याप्रसंगी लक्ष्मण कुमावत, रियाज पठाण, प्रेमचंद कुंकूलोळ, सरपंच सुनील शिरसाठ, सुनील शिनगारे, प्रताप देवरे, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, रमेश आव्हाड, आबा पवार, दीपक कदम, सुनील क्षीरसागर, आशिष धनवटे, संतोष परदेशी, शरद पवार, प्रवीण नवले, भैय्या शाह, प्रशांत राऊत, तुषार अभंग, मच्छिंद्र मासाळ, इसाकभाई पठाण, अन्सारभाई शेख, सुरेश ठुबे, युवा काँग्रेसचे अक्षय नाईक, सनी मंडलीक, प्रतीक बोरावके, कृष्णा पुंड, अमोल नाईक, सिद्धार्थ छल्लारे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com