श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर नगरपालिकेकडून होत असलेल्या शेवाळयुक्त पाणी पुरवठ्याविरुद्ध श्रीरामपूर शहर काँग्रेसच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांना

पिण्याच्या पाण्याचा एकच आधार, 20 रुपयाचा पाण्याचा जार’ असे प्रतिकात्मक आंदोलन श्रीरामपूर नगरपालिकेसमोर करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून नगरपालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. म्हणून जोपर्यंत नगरपालिका स्वच्छ पाणी पुरवत नाही तोपर्यंत कोणीही पाणीपट्टी भरू नये, असे आवाहन करण्यात आले. त्यामुळे तातडीने शहरातील नागरिकांना स्वच्छ असे पाणी द्यावे, अन्यथा शहरातील नागरिकांना घेऊन मोठे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे म्हणाले की, 2 महिन्यांपूर्वी पिण्याच्या पाण्याच्या तलावामध्ये 2 मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडले. त्यामुळे नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. अशा प्रकारचे घाणेरडे असलेले पाणी शहरातील लोकांना प्यावे लागत असून हे दुर्दैव आहे.

जिल्हा काँगेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले, सनदशीर मार्गाने आंदोलन केल्यावर सत्ताधार्यांनी प्रश्न सोडवण्याऐवजी वैयक्तिक आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे जनता त्यांना कधीही माफ करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

शहराध्यक्ष संजय छल्लारे म्हणाले खराब पाण्यामुळे अनेक नागरिक दवाखान्यात उपचार घेत आहेत. एवढे होऊनही सत्ताधारी निष्ठुर झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सर्रास घाणेरडा असा पाणीपुरवठा केला जात आहे.

नगरसेवक श्रीनिवास बिहाणी म्हणाले, चार वर्षाअगोदर श्रीरामपूर पाण्यासाठी राज्यभर प्रसिद्ध होते. ती ओळख सत्ताधार्यांनी रसातळाला घातली आहे. त्यामुळे स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी सत्ताधार्यांनी लक्ष घालावे, असे सांगितले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. समीन बागवान, शराध्यक्ष अभिजित लिप्टे , रियाज पठाण यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी नगरसेवक दिलीप नागरे, रितेश रोटे, मुन्ना पठाण, सुहास परदेशी, जिल्हा काँग्रेसचे खजिनदार लक्ष्मण कुमावत, सुरेश शिंदे, मागासवर्गीय काँग्रेसचे सुभाष तोरणे,जावेद शेख, युवक काँग्रेसचे प्रसाद चौधरी, सरबजीत चुग, रावसाहेब आल्हाट, राजू डुकरे, एनएसयुआयचे सनी मंडलीक, रितेश एडके, नवले मामा, मुन्ना परदेशी, अमोल नाईक, युनूस पटेल, जाफर शाह, राहुल बागुल, कृष्णा पुंड, अतुल वढणे, राजेश जोंधळे, सिद्धांत छल्लारे, शेबाज पटेल, सागर दुपाटी, गोपाल भोसले उपस्थित होते.