लॉकडाऊनचा फायदा घेत शहरात भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले

लॉकडाऊनचा फायदा घेत शहरात भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लॉकडाऊनचा फायदा घेत शहरात भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील मोरगे वस्ती भागात दिवसाढवळ्या चोर्‍या होत आहेत. या मरिसरात पोलिसांची गस्त सुरू करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

करोनाच्या महामारीमुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे लोक घरात आहेत. अनेकांच्या घरी कोविडचे रूग्ण असल्याने घरी असलेल्यांची संख्या कमी आहे. त्याचा फायदा घेत चोरटे दिवसा चोर्‍या करत आहेत. मोरगे वस्ती भामातून दोन दिवसात घराबाहेरील सायकली, चपला, कपडे अशा स्वरूपाच्या वस्तू चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. किरकोळ घटना असल्याने याप्रकरणी मात्र कोणीही पोलिसात तक्रार दिलेली नाही.

लॉकडाऊनमुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. दुपारच्यावेळी अनेक जण घरात विश्रांती घेत असतात. याशिवाय या परिसरात अनेक घरातून कोविडचे रूग्ण आहेत. काहींवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळे या लोकांच्या घरी मोजकेच लोक असतात. अनेकदा ते दवाखान्याच्या कामामुळे घराबाहेर असतात. घरी कोणी नाही याची पाळत ठेवून चोरटे त्या घराबाहेरून वस्तु चोरून नेतात. अलिकडच्या काही दिवसात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी या भागात गस्त सुरू करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com