श्रीरामपूर : संजयनगर, ईदगाह मैदान परिसराच्या नामांतरास नागरिकांचा विरोध

संविधान बचाव समितीचेे मुख्याधिकार्‍यांना निवेदन; उपनगरांचेे नाव बदलण्याचा प्रश्नच नाही- पटेल
श्रीरामपूर : संजयनगर, ईदगाह मैदान परिसराच्या नामांतरास नागरिकांचा विरोध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील संजयनगर(Shrirampur Sanjay Nagar) , र्ईदगाह मैदान (Eidgah grounds) परिसराचे गोविंदनगर (GovindNagar) असे नामांतर करू नये, अशी मागणी श्रीरामपूर संविधान बचाव समितीच्यावतीने (Shrirampur Constitution Defense Committee Demand) करण्यात आली असून या मागणीचे निवेदन श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे (Shrirampur Municipal Council CEO Ganesh Shinde) यांना देण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 1 व 2 तसेच प्रभाग क्र. 12 या भागाला गेल्या अनेक वर्षापासून संजयनगर, ईदगाह मैदान परिसर, रामनगर, गोपिनाथनगर, मिल्लतनगर या नावाने ओळखले जाते. सर्व पत्रव्यवहार या नावानेच होत असतात. परंतु काही लोकांच्या सांगण्यावरून या भागाला गोविंदनगर असे नाव देण्यात यावे, असा ठराव नगरपालिकेने (Municipal Council) मंजूर केला आहे. दि. 30 मार्च 2021 रोजी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्र. 96/2 अन्वये मंजूर केलेला आहे. सदर ठराव हा या भागातील बहुसंख्य नागरिकांना मान्य नाही.

सदरचा ठराव रद्द करून या परिसराला संजयनगर, ईदगाह मैदान परिसर या नावानेच ओळखण्यात यावे, या परिसरातील राहणार्‍या सर्वसामान्य नागरिकांच्या लोकभावनेचा गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी संविधान बचाव समितीचे अहमदभाई जहागिरदार, एजाज बारूदवाला, साजीदभाई मिर्झा, फिरोज पठाण, नदिम तांबोळी, फिरोज शेख, मोहसीन शेख, रियाज पोपटीया, सलीम जहागीरदार, जावेद तांबोळी, सलीम झुलेवाले, अबुभाई पेंटर, शाहीद कुरेशी, अबुल मणियार, आदील मखदुमी आदी उपस्थित होते.

दरम्यान, शहरातील संजयनगर, रामनगर, ईदगाह परिसर, मिल्लतनगर, गोपिनाथनगर, या उपनगरांचे कसल्याही प्रकारचे नाव बदलण्याचा ठराव करण्यात आलेला नाही, विरोधकांनी सोशल मीडियावर या उपनगरांची नावे बदलली जात आहे, अशी अफवा पसरवली आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राष्ट्रवादी युवकचे अल्तमश पटेल यांनी केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात श्री. पटेल यांनी म्हटले आहे की, सध्या शहरात जवळपास नागरिकांच्या भौतिक गरजांची सर्व कामे मार्गी लागली आहेत. नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक (Shrirampur Municipal Council Mayor Anuradhatai Adik) यांच्या नेतृत्वाखाली शहरांमध्ये जिथे घर तिथे रस्ता या संकल्पनेतून शहरातील सर्व रस्त्यांची कामे मार्गी लागली आहे, सध्या विरोधकांकडे कसलेही प्रकारचा मुद्दा उरलेला नाही. त्यामुळे विरोधक हतबल झाल्याने सोशल मीडियावर (Social Media) नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु येथील नागरिक सुज्ञ असून विरोधकांच्या अफवांना बळी पडणार नाहीत. जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,असेही पटेल यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com