श्रीरामपूर शहरातील विविध समस्या सोडवा
सार्वमत

श्रीरामपूर शहरातील विविध समस्या सोडवा

काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकार्‍यांना निवेदन; उपोषणाचा इशारा

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबतचे निवेदन श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना तालुका काँग्रेस कमिटी व अल्पसंख्याक काँग्रेस,युवक काँग्रेस कमिटीच्यावतीने देण्यात आले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहराचे मध्य रेल्वेमुळे दोन भाग झाले आहेत. वरील परिसराचा भाग नेहमी नागरी समस्यांमुळे त्रस्त आहे. शहरातील व शहराबाहेरील नागरिकना जाणे येण्यासाठी सिद्धार्थनगर रेल्वे अंडरग्राऊंड या पूलाचा मोठ्या प्रमाणार वापर होतो. पावसामुळे या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे येणारी जाणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद ठेवावी लागते. त्यातच पुलाखाली दिवसाच अंधार पडतो.

महिलांना कॅालेज तरुणींना जाणे-येणे धोक्याचे झाले आहे. शिवाय पुलाखाली व बाहरील बाजूस पथदिवेही नाहीत. अशा असुविधांमुळे परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे त्यांना रेल्वे ओव्हर ब्रीज किंवा सय्यद बाबा दर्गा चौकातून जावे लागते.

रेल्वे पलिकडील परिसरात तालुका पोलीस स्टेशन, सर्व प्रकारची सरकारी कार्यालये, दवाखाने, न्यायालये, कॉलेज शाळा, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय व इतर प्रशासकीय कार्यालये आहेत. त्याचप्रमाणे इतरही महत्त्वाची ठिकाणे आहेत. नेहमीच या पुलाखाली पाणी साचून हा पूल वाहतुकीसाठी बराचकाळ बंद असतो.

तसेच सिध्दार्थनगर ते आशिर्वादनगर, इंदिरानगर व आरटीएा ग्रामिण रुग्णालयाकडे जाणारे नागरिकही याच रस्त्याचा वापर करतात; परंतु हा रस्ता अनेक दिवसांपासून वाहतुकीसाठी योग्य नाही. तसेच मदरतेरेसा चौक, जर्मन हॉस्पिटल परिसरात गेली 1 त 2 वर्षांमध्ये पिण्याचे पाणी कमी दाबाने मिळत आहे. अनेकवेळा नगर परिषदेकडे तोंडी व लेखी स्वरुपात तक्रारी केल्या. पदाधिकारी याच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या परंतु आश्वासनांखेरीज काहीच मिळाले नाही.

अशा सर्व समस्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना श्रीरामपूर अनुसूचित जाती विभागाचे तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष तोरणे, अल्पसंख्याक काँग्रेस विभाग सचिव दीपक कदम व युवक काँग्रेसचे सुरेश ठुबे यांनी दिले आहे. वेळेत मागण्यांची पूर्तता न झाल्यास उपोषणला बसण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com