तीन तोळ्याची सोन्याची चेन चोरट्यांनी धूमस्टाईलने लांबविली

गुन्हा दाखल
तीन तोळ्याची सोन्याची चेन चोरट्यांनी धूमस्टाईलने लांबविली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दिवाळीच्या काळात घराची साफसफाई करून कचरा घराबाहेर टाकण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळयातील 3 तोळ्याचे सोन्याचे गंठन धूमस्टाईलने ओढून नेण्याचा प्रकार वॉर्ड नं.7 मधील पूर्णवादनगर ते मुळाप्रवरा रोडवर घडला.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्णवादनगर, वार्ड नं. 7, श्रीरामपूर येथील बांधकाम व्यावसायिक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिवाळीच्या काळात घराची साफसफाई सुरू असताना घरातील कचरा टाकण्यासाठी माझी आई या घराबाहेर पूर्णवादनगरकडून मुळाप्रवराकडे जाणार्‍या रस्त्यावर आली असता पूर्णवादनगरकडून एका मोटारसायकलवर आलेल्या दोघा इसमांपैकी मोटारसायकलच्या पाठीमागे बसलेल्याने माझ्या आईच्या गळ्यातील सोन्याची 3 तोळ्याची अंदाजे किंमत 90 हजार रुपये किंमतीची चेन हिसकावून ओढून नेली. सदर गाडी भरधाव वेगात निघून गेली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com