
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील दूध आणायला चाललेल्या महिलेच्या गळ्यातील 40 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र (गंठण) गळ्यातून ओरबाडून नेल्याची घटना बुधवारी रात्री 8.45 वा. घडली.
याबाबत मंजुषा मनोज राठी (वय 49, रा. सेंट्रल बँके समोर, येनगे हॉस्पिटल शेजारी, वार्ड. नं. 4, श्रीरामपूर) या महिलेने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. आपण कुंभारगल्ली येथे श्री. घोडे यांच्या घरी दूध आणण्यासाठी जात असताना गिरमे चौकाकडून जिजामाता चौकाकडे जाणार्या दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले. त्यांतर ते कुंभार गल्लीतून धूमस्टाईल दुचाकीवरून पसार झाले.
राठी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा जणांविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांत भादंवि कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.