श्रीरामपुरात वाळूचा ट्रॅक्टर पकडला; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपुरात वाळूचा ट्रॅक्टर पकडला; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर एक भागातील मिल्लतनगर ते गोंधवणी रोड येथील पुलाजवळ काल पोलिसांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. ट्रॅक्टर चालक गंगाधर गोरक्षनाथ सोनवणे (वय 35, रा. गोंधवणी, वॉर्ड नंबर 1, श्रीरामपूर) याच्यासह सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर व त्यातील वाळू असा एकूण तीन लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

याबाबत पोलीस शिपाई नरवडे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 427/2021 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पीएसआय श्री. घायवट यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. पवार हे पुढील तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com