
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरामध्ये (Shrirampur City) गोवंश जातीच्या (Cattle) जनावरांची वाहतुक करणार्या दोन जणांना पोलिसांनी (Police) 1, 97, 000 रु. किंमतीच्या मुद्देमालासह अटक (Arrested) केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katake) यांना गुप्तबातमीदारा मार्फत गोपनिय माहिती मिळाली की, श्रीरामपूर (Shrirampur) येथील एक इसम टाटा एसी क्रमांक एमएच/39-डब्लु-134 यामधुन महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यासाठी बाबरपुरा चौक, वॉर्ड नं. 2, ता. श्रीरामपूर येथुन वाहतुक करणार आहे,
त्यानुसार पोलिस उप निरिक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय वेठेकर, बबन मखरे, दत्ता हिंगडे, पोलीस नाईक सचिन आडबल, शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबलॅ सागर ससाणे व चा पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन बेरड, पोलीस नाईक कारखिले यांनी बाबरपुरा चौक, पाण्याचे टाकी जवळ, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर येथे सापळा लावला असता पाटाकडुन येणारे रस्त्याने एक टाटा एसी छोटा टेम्पोमध्ये दोन इसम व पाठीमागे दाटीवाटीने भरलेली जिवंत लहान मोठी एकुण 9 जनावरे दिसली.
पोलिसांनी जनावरे तसेच टेंम्पो असा 1, 97, 000 रु. किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकतणी बुंदी ऊर्फ मोहसिन इसाक कुरेशी (वय 32, रा. कुरेशी मोहल्ला, वॉर्ड नं.2, ता. श्रीरामपूर) व निसार इक्बाल कुरेशी (वय 43, रा. पाण्याचे टाकीजवळ, ता. श्रीरामपूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.