वाळूची वाहने पेटविल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल

वाळूची वाहने पेटविल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पात्रातील नायगाव परिसरातून चोरटी वाळुची वाहतूक करत असताना पोलिसांनी छापा टाकला. यावेळी काही जणांनी ट्रक जाळल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात नायगाव, गोवर्धन, सराला परिसरात रात्री वाळू तस्करांचा धुमाकूळ सुरू असून गुप्त खबरीवरुन पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील यांनी रात्री नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात जावून कारवाई केली. त्यावेळी अंधारात अज्ञात आरोपींनी दोन वाळूच्या ट्रक पेटवून दिल्या. त्यात ट्रकचे टायर जळून नुकसान झाले. अशाही परिस्थिती एक वाळूचा ट्रक व दोन ट्रक टायर जळालेल्या स्थितीत पोलिसांनी जप्त करुन तालुका पोलीस स्टेशनला आणल्या.

याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.पहिल्या गुन्ह्यात पो.ना. लोंढे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी हायवा डंपर चालक शेखर संजय जाधव, रा. शिरुर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुरनं. 138/2021 प्रमाणे भादंवि कलम 379, 511 अन्वये दाखल करण्यात आला. गोदावरी नदीपात्रात वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी अडवून ठेवलेला डंपर मिळून आला.

दुसर्‍या गुन्ह्यात हे.कॉ. औटी यांच्या फिर्यादीवरुन टेम्पो नं. एमएच 04 एफडी 662 व एक पांढर्‍या रंगाचा बिगर नंबरचा आयशर टेम्पो चालक व मालक तसेच अज्ञात लोकांविरुद्ध तालुका पोलिसात गुरनं. 137/2021 प्रमाणे भादंवि कलम 379, 427 प्रमाणे दाखल करण्यात आला.

गोदावरी नदीपात्रात वाळू तस्करी वाहतूक करण्यासाठी आले असता वाळू भरताना ग्रामस्थांनी या गाड्या अडवून ठेवल्या होत्या. नंतर अज्ञात लोकांनी अंधारात या गाड्या पेटवून दिल्या. पोलीस उपअधिक्षक़ संदिप मिटके, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सतिश गोरे हे पुढील तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com