
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर बस स्थानकाच्या परिसरात काल पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह आढळून आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काल दुपारच्या दरम्यान बस स्थानकाच्या आवारात एक अनोळखी व्यक्ती निपचित पडलेली दिसून आली. याबाबतची माहिती श्रीरामपूर आगारात देण्यात आली.
स्थानकातील अधिकार्यानी शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता 30 ते 40 वयोगटातील पुरुष जातीची व्यक्ती मृत स्थितीत असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने अनोळखी मृत व्यक्तीस रुग्णालयात नेले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदरच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरिक्षक समाधान सुरवाडे यांनी केले आहे.