श्रीरामपुरात तीन ठिकाणी घरफोडी करणारे दोघे जेरबंद

श्रीरामपुरात तीन ठिकाणी घरफोडी करणारे दोघे जेरबंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील मिल्लतनगर परिसरात तीन घरफोड्या करणार्‍या दोन आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून दोन मोबाईल हस्तगत केले आहेत. यातील एक आरोपी श्रीरामपूर तर दुसरा आरोपी संगमनेरचा आहे.

दि. 2 ते दि. 3 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये वार्ड नंबर एकमधील मिलतनगरमध्ये राहणारे अन्सार इनामदार तसेच याच गल्लीतील नयन टपाल व मोहसीन शहा या तिघांचे घर फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, संसारोपयोगी वस्तू तसेच मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 3 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. या प्रकरणाची फिर्याद श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.

पोलीस तपासमध्ये पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांचा शोध घेतला असता सुफियान सय्यद (रा. नायकवाड पुरा, संगमनेर), अझरुद्दीन सय्यद (रा. मिल्लतनगर, श्रीरामपूर) यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीस गेलेले दोन मोबाईल त्यांच्या जवळून जप्त करण्यात आले.

या कारवाईत पोलीस निरीक्षक गवळी यांच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, सहाय्यक फौजदार सुधीर हापसे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल रमिजराजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस न कॉन्स्टेबल मच्छिंद्र खातखडे आदींनी भाग घेतला. अधिक तपास सहाय्यक फौजदार सुधीर हापसे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com