श्रीरामपुरात पोलिसांनी गोमांस पकडले

श्रीरामपुरात पोलिसांनी गोमांस पकडले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर पोलिसांनी शहरात दोन ठिकाणी छापे घालून सुमारे 1400 किलो गोमांस पकडले. याप्रकरणी पोलिसांनी एका जणास ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील सूतगिरणी तसेच वॉर्ड नंबर 2 मध्ये वाहनातून गोमांसाची वाहतूक होत असल्याचे खबर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी याठिकाणी पथके पाठवून छापा घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने छापा घातला असता पोलिसांनी पहाटे सूतगिरणी रस्त्यावर 650 किलो तर दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील वॉर्ड नंबर 2 मध्ये 750 किलो गोमांस भरलेली टोयोटा इटोस ( क्र. एम एच 14 डी टी 4075) कारसह एका व्यक्तीस ताब्यात घेतले.

गोमांसविरोधात पोलिसांनी एकाच दिवसात दोन ठिकाणी धडाकेबाज कारवाई केली. पोलिसांनी पशु संवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मच्छिंद्र कोते यांना पाचारण करून गोमांसाचे नमुने तपासणीसाठी पाठविले. या दोन्ही गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या आदेशावरून शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे, पोलीस नाईक रघुवीर कारखीले, गणेश गावडे, मच्छिंद्र कातखडे, सोमनाथ गाढेकर, भारत तमनर, गौरव दुर्गुळे आदींनी ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com