श्रीरामपुरात धुमश्चक्री

माजी नगरसेवकासह वाळू व्यावसायिकास जबर मारहाण
श्रीरामपुरात धुमश्चक्री

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लहान मुलाच्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत बाचाबाची आणि त्यानंतर हाणामारीत रूंपातर झाले. यात माजी नगरसेवक, वाळू व्यावसायिक तसेच अन्य काही तरूणांना दुसर्‍या गटाकडून जोरदार मारहाण करण्यात आली. ही घटना काल रविवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

एका लहान मुलास गाडीचा कट लागला. त्यात तो मुलगा खाली पडला तसेच त्याला मार लागला यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी दोन्ही गटाकडून फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com