'अशोक' कारखाना निवडणुकीचा निकाल पाहा एका क्लिकवर..

'अशोक' कारखाना निवडणुकीचा निकाल पाहा एका क्लिकवर..

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल २१ जागांसाठी मतदान झाले असून ११७७४ मतदारांपैकी १०५०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अशोक सहकारी साखर कारखान्यात काल एकूण ९३ टक्के मतदान झाले असून तर सोसायटी मतदार संघात १०० टक्के मतदान झाले. या कारखाना इतिहासात हे विक्रमी आणि शांततेत मतदान झाले आहे. काल ४२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

५ गटातील सर्वसाधारण प्रवर्गातील मतमोजणी सुरू असून या जागांवरही मुरकुटे गटाचे उमेदवार आघाडीवर

महिला वर्गातून मुरकुटे गटाच्या शितल गवारे आणि हिराबाई साळुंके विजयी

इतर मागास मुरकुटे गटाचे अमोल कोकणे विजयी

भटक्या विमुक्त जाती वर्गातून मुरकुटे गटाचे यशवंत दिनकर रणनवरे, प्रविण रामचंद्र देवकर विजयी

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी खाते खोलले. ब वर्ग सोसायटीत मुरकुटे गटाचे सोपान राऊत विजयी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com