अट्टल गुन्हेगार मुल्ला कटरला मदत करणारा आणखी एक पोलीस कर्मचारी निलंबित

अट्टल गुन्हेगार मुल्ला कटरला मदत करणारा आणखी एक पोलीस कर्मचारी निलंबित

श्रीरामपूर | प्रतिनिधी

मुल्ला कटर या अट्टल गुन्हेगाराला मदत करणाऱ्या श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस सुनील दिघे याला जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी निलंबित केले. याच प्रकरणात यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय सानप व पोलीस नाईक पंकज गोसावी याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

अट्टल गुन्हेगाराशी पोलीसांचे असलेले आर्थिक हितसंबंध आता उघड झाले आहे. श्रीरामपूर शहरातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्या बरोबर निकाह केला. सलग तीन वर्षे मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी मुल्ला कटर याला अटक करण्यात आली.

आरोपी मुल्ला कटर याला श्रीरामपूर शहर पोलीसन स्टेशनचे पोलीस नाईक पंकज गोसावी, सुनील दिघे हे मदत करून फिर्यादी लोकांवर फिर्याद मागे घेण्याबाबत नेहमीच दबाव आणत असल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यामार्फत या तक्रारीची चौकशी करण्यात आली.

पोलीस निरीक्षक संजय सानप व पोलीस नाईक पंकज गोसावी याच्यासह दिघे याचे संबंध स्पष्ट झाल्याने मनोज पाटील यांनी गोसावी पाठोपाठ दिघे याला निलंबित केले. दरम्यान मुल्ला कटरच्या गुन्ह्यात आपण कुठलीही मदत केली नसल्याचा दावा निलंबित पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com