श्रीरामपूर व बेलापूर बंदला उस्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर व बेलापूर बंदला उस्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर | प्रतिनिधी

येथील अल्पवयीन मुलीचा अद्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेने (Shivprahar Sanghatana) पुकारलेल्या बंदला श्रीरामपूर (Shrirampur) व बेलापूर (Belapur) गावातील व्यापारी आणि नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन यशस्वी केला. पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अशी मागणी केली.       

येथील अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात अजूनही पोलीसांना (Police) यश आलेले नाही. या संदर्भात पोलीसांना वेळोवेळी निवेदने दिली ,रास्ता रोको केला तरीही पोलीसांना त्या अल्पवयीन मुलीस फुस लावणाऱ्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे आपल्या मुलीचे काही बरे वाईट तर झाले नसेल ना? अशी शंका नातेवाईकांना येत आहे.

पोलीस केवळ अश्वासने देत आहे त्या पार्श्वभूमीवर या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेच्या वतीने पुकारलेल्या बंदला श्रीरामपूर व बेलापूर गावातील सर्व व्यापारी, नागरीकांनी प्रतिसाद दिला. सर्वांनी स्वेच्छेने आपले व्यवहार बंद ठेऊन सहभाग घेतला. तसेच लाँक डाऊन मुळे सर्व व्यवहार बंद होते आज पासुन शासनाने वेळेची मर्यादा वाढविली असली तरी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्यामुळे सर्वानी दुकाने बंद ठेवुन या घटनेचा निषेध नोंदविला.

पोलीस निरीक्षक संजय सानप, उपनिरीक्षक कृष्णा धायवट, हवालदार अतुल लोटके ,पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे ,गणेश भिंगारदे, पोपट भोईटे ,निखील तमनर, हरिष पानसंबळ आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.त्यामुळे बंद शांततेत पार पडला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com