टाकळीभान येथे कांदा 2000 रुपयांवर

टाकळीभान येथे कांदा 2000 रुपयांवर

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Shrirampur Agricultural Produce Market Committee) टाकळीभान उपबाजारात (Taklibhan Sub Market) कांदा (Onion) दोन हजरावर स्थिरावला. गेल्या कांदा लिलावात (Onion Auction) चांगलाच भाव खाल्ला होता. काल मंगळवारी 1 नंबर कांद्याला (Onion) 2000 रुपयाचा दर मिळाला. कांदा बाजारात (Onion Market) 2 हजार 973 कांदा गोण्यांची आवक झाली होती.

यावेळी एक नंबरच्या कांद्याला (Onion) 1 हजार 400 ते 2 हजार रुपये, दोन नंबरला 800 ते 1 हजार 300 रुपये, तीन नंबरला 200 ते 700 रुपये तर गोल्टी कांद्याला 700 ते 1 हजार 350 रुपयाचा दर मिळाला. कांदा भाव घसरल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर चिंतेच्या छटा दिसून येत होत्या.

करोनाच्या संकटामुळे शासकीय नियमांचे पालन (Compliance with Government Regulations) करीत लिलाव प्रक्रिया होत आहे. परिसरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना इतर कांदा बाजारच्या तुलनात्मक रास्त दर मिळत असल्याने आपला कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती संगिता शिंदे, उपसभापती नितिन भागडे, संचालक नानासाहेब पवार, विद्याताई दाभाडे, सचिव किशोर काळे, उपबाजार व्यवस्थापक दिनकर पवार यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.