टाकळीभान उपबाजारात चिखलाचे साम्राज्य

फुटभर चिखलातून शोधावा लागतो मार्ग; ग्रामस्थ त्रस्त
टाकळीभान उपबाजारात चिखलाचे साम्राज्य

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Shrirampur Agricultural Produce Market Committee) टाकळीभान उपबाजारात (Takalibhan Sub Market) बाजार समितीला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आसले तरी मूलभूत सेवा सुविधा व उपबाजारचे आवार चिखलमुक्त करण्याकडे बाजार समितीने डोळेझाक केली असल्याने व्यापार्‍यांसह शेतकरी व वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उपबाजार (Sub Market) आवार चकाचक करण्याची मागणी होत आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Shrirampur Agricultural Produce Market Committee) टाकळीभान (Takalibhan) येथील उपबाजारच्या (Sub Market) प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. दुकान गाळे अनामत रकमा, दुकान गाळा भाडे, कांदा आडत, भुसार आडत तसेच ईले. वजन काटा यामुळे या उपबाजारच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढलेला आहे. कांदा (Onion) व भुसार आडत व्यापारामुळे मोठी उलाढाल होत आहे. बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होत असली तरी व्यापारी व शेतकर्‍यांना सुविधा देण्याकडे बाजार समितीच्या प्रशासनाचे दुर्लक्ष (administration Ignore) होताना दिसत आहे.

त्यामुळे बाजार आवारात चिखलाचे (Mud) व खड्ड्यांचे (Pits) साम्राज्य वाढले आहे. फूटभर पाण्याच्या डबक्यातून व चिखलातून (Mud) व्यापारी, शेतकरी व वाहनधारकांना मार्ग शोधत चालावे लागत आहे. या प्रकारामुळे नाराजीचा सूर उमटत असून बाजार समितीच्या उत्पन्नावर त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या महिन्यात माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील (Former Minister MLA Radhakrishna Vikhe Patil) टाकळीभान (Takalibhan) दौर्‍यावर आले असता उपबाजारच्या आवारातील व्यापार्‍यांनी उपबाजार आवारात डांबरीकरण करण्याची मागणी विखे पाटील यांच्याकडे केली होती. बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याने विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी तातडीने काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे शेतकरी व व्यापार्‍यांना हायसे वाटले होते. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही शेतकरी, व्यापारी व वाहनधारकांची दैना फिटली नाही. त्यामुळे पायी चालणारांना गुडघाभर पँट सावरून चपला हातात घेऊनच उप बाजार समितीच्या आवारात चालावे लागत आहे ही वस्तुस्थिती आहे.

टाकळीभान उपबाजार आवारात सेवा सुविधा देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उपबाजार आवारात काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सुमारे एक कोटीच्या कामांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पणन महामंडळाकडे लवकरच पाठविण्यात येणार आहे. साधारण एक ते दीड महिन्यात ही सर्व कामे सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.

- नानासाहेब पवार संचालक, कृ.उ.बा. श्रीरामपूर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com