श्रीरामपूर तालुक्यात 13 करोनाबाधित रुग्ण

130 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 13 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 13 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampu) तालुक्यात काल केवळ 13 करोनाबाधित रुग्ण (corona Positive Patient) आढळून आले आहेत. काल 130 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह (Active Patient)असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार (Treatment in hospitals) घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 13 होती.

जिल्हा रुग्णालयात 02 खासगी रुग्णालयात 09 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 02 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर (Shrirampu)तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 15613 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 15483 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 5-02, असे 03 तर ग्रामीण भागात बेलापूर बुदुक-01, बेलापूर खुर्द-01, उक्कलगाव-02, खिर्डी-01, गुजरवाडी-01, शिरसगाव-01, असे 07 रुग्ण आहेत.

श्रीरामपूर शहरात केवळ 03 रुग्ण असून ग्रामीण भागात 07 तर ज्या रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता चुकीचा आहे असे 03 रुग्ण असून श्रीरामपूर तालुक्यात असे एकूण केवळ 13 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com