श्रीरामपूर तालुक्यात 132 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

15 नवीन करोनाबाधित; 13 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 132 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur) काल केवळ 15 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले आहेत. काल 132 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह (Active Patient) असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 13 होती.

जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 09 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 06 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 15628 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 15496 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 7-02, असे 03 तर ग्रामीण भागात बेलापूर बुदु्रक-01, उक्कलगाव-02, गळनिंब-01, वांगी-01, निमगावखैरी-04, शिरसगाव-01, असे 10 रुग्ण आहेत.

श्रीरामपूर शहरात केवळ 03 रुग्ण असून ग्रामीण भागात (rural areas) 10 तर ज्या रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता चुकीचा आहे असा 02 रुग्ण असून श्रीरामपूर तालुक्यात असे एकूण केवळ 15 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com