श्रीरामपुरातील 'त्या' जखमी तरुणाचा मृत्यू

file photo
file photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील बेलापूर रोडवरील सिध्दीविनायक मंदिरासमोर स्कॉर्पिओ आणि दुचाकीचा दि. 14 सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातातील जखमी आकाश भोसले या तरुणाचा उपचारा दरम्यान नगर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी स्कॉर्पिओ चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरूवार दि. 14 सप्टेंबर रोजी बेलापूर येथील चर्चमधील प्रार्थनेनंतर पुन्हा श्रीरामपूर येथील आपल्या घरी आकाश भोसले, महिमा भोसले, सुभद्रा भोसले हे तिघे मोटारसायकलवरून परतत असताना रात्री बेलापूर रोडवरील सिद्धीविनायक मंदिरासमोर स्कॉर्पिओने समोरून त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात आकाशच्या डोक्याला मार लागल्याने त्याला सुरूवातीला साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी लोणी आणि त्यानंतर नगर येथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

परंतु उपचारादरम्यान आकाश याचा मृत्यू झाला. या अपघातात महिमा भोसले, सुभद्रा भोसले यांनादेखील चांगला मार लागला असून महिमा हिच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com