कारला धडक देऊन कंटेनर पलटी

दोन महिला डॉक्टरांना नगराध्यक्षा आदिक यांनी केली मदत
कारला धडक देऊन कंटेनर पलटी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील नेवासरोड उड्डाणपूल जवळ कंटेनर ट्रकने दोन वाहनांना धडक देऊन तिसरी धडक कारला देऊन ट्रक रस्त्याच्या खाली पलटी झाला. दरम्यान, नगराध्यक्षा अनुराधा आदिक या हरेगावकडे जात असताना त्यांनी तात्काळ कारमधील अपघातग्रस्तांना बाहेर काढून स्वतःच्या गाडीत कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

काल दुपारी 2 वाजेच्या सुमारास रिकाम्या कंटेनरने (क्र. एमएच 43 यु 9634) ने नेवासरोड उड्डाणपूल जवळ कारला (क्र. एम एच 29 आर 7444) तिसरी धडक धडक दिली. यामध्ये शहरातील डॉ. अतुल करवा यांच्या पत्नी डॉ. सपना करवा यांच्या सोबत जालना येथील डॉ. करवा यांची बहीण डॉ. दिपाली राजू मुंदडा या होत्या. अपघातामध्ये डॉ. मुदंडा (वय 45) यांना मार जास्त लागला. नगराध्यक्षा अनुराधा आदिक या आपल्या वाहनाने दुपारी हरेगाव ला घरी जात असताना त्यांच्या समोर हा अपघात घडला अनुराधा आदिक यांनी आपली गाडी थांबवून अपघात झालेल्या कार जवळ पोहोचल्या कार आणि ट्रक यांच्या धडकेत कार चे मोठे नुकसान झाले होते त्या मधील डॉक्टर कारवा आणि डॉक्टर दिपाली मुंदडा याना बाहेर कडून त्याना कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर कामगार हॉस्पिटलमध्ये डॉ. रविंद्र जगधने व त्यांचे सहकारी उपचार करत आहेत.

ट्रक भरधाव वेगाने येऊन कारला धडक देऊन रस्त्याच्या खाली पलटी झाली. ट्रक ड्रायव्हरने मद्य प्राशन केले होते, असे नगराध्यक्षा आदिक यांनी सांगितले.

या ट्रकने टाकळीभान येथे दोन वाहनांना धडक देऊन उड्डाणपूलजवळ या कारला धडक दिली. सायंकाळी उशिरा संबंधीत ड्रायव्हरविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

कर्तव्यतत्पर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यामुळे अपघातातील दोन्ही डॉक्टर महिलांना मदत मिळू शकली. लॉकडाऊन काळात आपल्या कोविडच्या रुग्णांना नगराध्यक्षा आदिक यांनी मदत केली आहे. आजच्या या घटनेतून त्यांनी माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com