विवाहित तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

विवाहित तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

टिळकनगर | वार्ताहर

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर-खंडाळा रस्त्यावरील प्रभात डेअरी जवळ झालेल्या अपघातात येथील विवाहित तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सौरभ सुरेश ढोकचौळे (वय 27) अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दुपारी सौरभ श्रीरामपूर येथून खंडाळाच्या दिशने आपल्या दुचाकीवर जात असतांना बाभळेश्वरकडून येणाऱ्या क्लूजर गाडीचा सौरभच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेने सौरभ जागीच कोसळल्याने सौरभचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी सौरभला रुग्णालयात नेले असता डॉक्टरानी सौरभला मृत घोषित केले.

यापूर्वीही याच ठिकाणी शेकडो अपघात घडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. घटनेची माहिती पोलिसांकडून तात्काळ सौरभच्या घरी कळविण्यात आली. घटना घडताच गावांतील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. सौरभ प्रभात डेअरीच्या पाठीमागे वास्तवास होता. त्याच्या या अपघाताती निधनानंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील एक मुलगा एक मुलगी, पत्नी असा मोठा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com