श्रीरामपूर : शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच बसविण्यात यावा

5 कोटी अब्रुनुकसानीबाबत न्यायालयीन लढा सुरु ठेवणार : चित्ते
श्रीरामपूर  : शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच बसविण्यात यावा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) / Shrirampur - छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) अश्‍वारुढ पुतळा शिवाजी चौकातच व्हावा या मागणीसाठी आम्ही पालिकेत मुख्याधिकार्‍यांना घेरावो घालणे, श्रीरामपूर बंदचे आंदोलन केले होते त्या आंदोलनावरुन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी 5 कोटीचा अबु्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

त्यासह शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच बसविण्यात यावा यासाठी न्यायालयीन लढा देण्यास तयार आहे. त्यासाठी कुठलीही शिक्षा भोगण्याची तयारी असल्याचा इशारा श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारुढ पुतळा संघर्ष समितीचे प्रकाश चित्ते यांनी दिला आहे.

प्रकाश चित्ते यांनी काल पत्रकार परिषद घेवून खुलासा केला. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारुढ पुतळा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रविण फरगडे, नगरसेवक किरण लुणिया, अरुण पाटील, डॉ. दिलीप शिरसाठ, बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी, सुदर्शन शितोळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, बाजार समितीचे संचालक मनोज हिवराळे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्‍वारुढ पुतळा श्री शिवाजी चौकातच झाला पाहिजे, या मागणीसाठी शिवप्रेमींनी गेल्या 30 वर्षात अनेक आंदोलने केली. आधीच्या सत्ताधार्‍यांनी व आताच्या सत्ताधार्‍यांनी छत्रपतींचा पुतळा शिवाजी चौकातच बसवू अशी स्पष्ट व रोखठोक भुमिका जाहिर न केल्याने हे सत्ताधारी श्री शिवाजी चौक सोडून दुसरीकडेच छत्रपतींचा पुतळा बसवणार आहेत. त्यामुळेच श्री शिवाजी चौकातील पुतळ्याच्या मागणीला चळवळीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावनांशी खेळण्याचे परिणाम आदिकांना भोगावे लागतील.

नगराध्यक्षा आदिकांचे छत्रपतींच्या श्री शिवाजी चौकातील पुतळ्याच्या विषयात खायचे दात वेगळे असून दाखवायचे दात वेगळे आहे. त्यांची न्यायालयात वेगळी भूमिका आहे आणि प्रत्यक्षात वेगळीच भूमिका आहे. नगराध्यक्षांच्या या दुटप्पी भुमिकेच्या विरोधात आंदोलन केले तर ते त्यांना सहन होत नाही. छत्रपतींच्या पुतळ्याच्या विषयातच नाही; तर नगरपालीकेच्या इतर कुठल्याही विषयात नागरी समस्या, गैरव्यवहार आदींसारख्या दुसर्‍याने कुणीही त्यांच्यावर व त्यांच्या कारभारावर आरोपच करु नये, तालुक्यातल्या राजकिय पर्यावरणात भितीचा आणि धमकीचा संदेश जावा म्हणून आदिकांनी माझ्यावर 5 कोटीचा अबु्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. छत्रपतींचा पुतळा श्रीशिवाजी चौकात बसवायचा नाही, त्याविरोधात आंदोलन होवू द्यायचे नाही, त्यांचे विरोधात बोलायचे सुद्धा नाही, अशी मुस्कटदाबीची नगराध्यक्षांची भुमिका आहे. यापूर्वीही श्रीरामपूरच्या राजकारणात दिग्गज सत्ताधीश होवून गेले, तरी त्यांच्या काळात असली दादागिरी चालली नाही. त्यामुळे आदिकांचीही दादागिरी सहन करणार नाही, असा इशारा श्री. चित्ते यांनी दिला आहे.

यावेळी अ‍ॅड. अजित परदेशी, संजय पाडेे, प्रविण र्र्पैैठणकर, अभिजित कुलकर्णी, गणेश भिसे, सोमनाथ पतंगे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com