शिक्षण विभागाने दुसर्‍यांना आदर्श देणे गरजेचे - थोरात

शिक्षण विभागाने दुसर्‍यांना आदर्श देणे गरजेचे - थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

भाऊसाहेब संतुजी थोरात सह्याद्री ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे सन 2020-2021 व सन 2021-2022 वर्षाची पटपडताळणी व संच मान्यता सुरू आहे. जिल्हा परिषद अहमदनगर माध्यमिक विभागाचे शिक्षण उपनिरीक्षक श्रीराम थोरात यांनी अकोले, संगमनेर, कोपरगाव या तीन तालुक्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक यांना शिक्षण विभागातील अडचणी येऊ नये यासाठी सर्व सहकार्य माझ्याकडून केले जाईल आपल्याकडूनही सहकार्य अपेक्षित आहे.

आपल्या शिक्षण विभागाचा आदर्श हा इतर विभागाने घेतला पाहिजे असे प्रतिपादन उपनिरीक्षक श्रीराम थोरात यांनी केले. याप्रसंगी अहमदनगर शिक्षक भारती तर्फे श्रीराम थोरात यांचा सत्कार करण्यात आला तसेच श्रमिक जूनियर कॉलेज उपप्राचार्य राजेंद्र धमक यांनी देखील शिक्षण उपनिरीक्षक यांचा सत्कार केला याप्रसंगी अहमदनगर शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. किशोर डोंगरे, सरचिटणीस महेश पाडेकर, प्राचार्य मच्छिंद्र दिघे, राजापूर कॉलेजचे प्राचार्य घोडेकर, जिल्हा समन्वयक योगेश देशमुख, सल्लागार कैलास रहाणे, तालुका समन्वयक मनोहर राठोड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मारुती कुसमुडे, संचमान्यता शिबिर समन्वयक अमोल दातीर, शेंडी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिलीप रोंगटे, नरेश खाडगीर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल चंदनशिवे, कोपरगाव तालुका सचिव नरेंद्र लहिरे आदी पदाधिकारी प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पटपडताळणी शिबिर संपन्न झाले. याप्रसंगी सह्याद्री ज्युनिअर कॉलेजचे सहकार्य लाभले.

Related Stories

No stories found.