श्रीक्षेत्र सराला बेट येथे आज नारायणगिरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा

श्रीक्षेत्र सराला बेट येथे आज नारायणगिरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

ब्रम्हलीन सदगुरू नारायणगिरी महाराज यांची 13 वी पुण्यतिथी आज शुक्रवार 25 मार्च रोजी श्रीक्षेत्र सरालाबेट येथे साजरी करण्यात येत आहे. सकाळी 10 वाजता महंत रामगिरी महाराज यांचे कीर्तन व त्यानंतर पुरणपोळी महाप्रसादाने सांगता होईल.

आज मिती फाल्गुन कृ. 8 शुक्रवारी सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या 13 व्या पुण्यातिथी सोहळ्याची सराला बेट विश्वस्त मंडळाने तयारी केली असून, मार्च महिन्यातील कडक उन्हात हजारो भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून वेळेवर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

सकाळी 10 वाजता महंत रामगिरी महाराज यांच्या किर्तनानंतर येवला, नांदगांवसह, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील भाविकांनी वाहनातून आणलेल्या पुरणपोळी, मांडे महाप्रसाद एकाच महापंगतीत भाविकांना सुरळीत वाढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देवगिरी महानंदा संघ औरंगाबाद व लक्ष्मीमाता मिल्क खोकरफाटा यांच्यावतीने 3000 लिटर दुधाची व्यवस्था करण्यात आली आहे.समाधी मंदिर कार्यक्रम स्थळी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे व वैजापूर हद्दीत वांजरगाव पुलाबाहेर विरगांव पोलीस ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com