सराला बेट तिर्थक्षेत्र विकासाचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा!

सराला बेट तिर्थक्षेत्र विकासाचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा!

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीक्षेत्र सराला बेटाला (Shrikshetra Sarala Bet) तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत 1 कोटी 49 लाख रुपये मंजुरी असताना ग्रामविकास विभागाच्या (Rural Development Department) आदेशामुळे या निधीस स्थगिती (Fund Postponement) देण्यात आली होती. परंतु काल मुंबईत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ (Rural Development Minister Hassan Mushrif) यांनी एका आदेशानुसार या निधीवरील स्थगिती उठविली (Fund Postponement lifted) आहे. त्यामुळे हा विकास निधी मिळण्याचा सराला बेटाचा (Sarala Bet) मार्ग मोकळा झाला आहे.

श्री क्षेत्र सराला बेट (Shrikshetra Sarala Bet) येथे ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सन 2018-19 मध्ये 1 कोटी 49 लक्ष रुपये खर्चाच्या भक्त निवास बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. सदर कामाला ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयामुळे स्थगिती मिळाली होती. तथापि श्रीक्षेत्र सराला बेट येथील विविध विकासकामे मंजूर करून देण्यासाठी नामदार बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली आ. लहू कानडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या सदगुरु योगिराज गंगागिरी महाराज (Sadguru Yogiraj Gangagiri Maharaj) 174 व्या अखंड हरिनाम सप्तहाच्या निमित्ताने ही स्थगिती उठविण्याचे जाहीर केले होते.

काल मुंबईत मंत्रालयात राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रिफ (Rural Development Minister Hassan Mushrif) यांची आ. डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe), यांचे समवेत अशोकराव कानडे (Ashokrao Kanade), जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, अ‍ॅड. समीन बागवान यांनी भेट घेतली. या सर्वांनी सराला बेट (Sarala Bet) येथे ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सन 2018-19 मध्ये 1 कोटी 49 लाख रुपये खर्चाच्या भक्त निवास बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यास ग्रामविकास विभागाने दिलेली स्थगिती उठविण्याबाबत विनंती केली. ना. मुश्रिफ यांनी सदर कामाची आवश्यकता लक्षात घेऊन सदर स्थगिती उठविण्याबाबत आदेश संबंधित विभागास दिले. त्यामुळे सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा व भक्तनिवास उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे भक्तपरिवारात समाधानाचे वातावरण आहे.

Related Stories

No stories found.