खोटे गुन्हे दाखल झाले तरी निळवंडे कृती समिती संघर्ष सुरुच ठेवणार

खोटे गुन्हे दाखल झाले तरी निळवंडे कृती समिती संघर्ष सुरुच ठेवणार

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

दोन कंत्राटदारांमधील वाद मिटविण्यासाठी खा. सदाशिव लोखंडे व कृती समितीचे सदस्य पिंपरी निर्मळ 400 केव्ही शिवेवरील कालव्याजवळ गेले होते. वास्तवीक पाहता या कामाचे भूमीपुजन सकाळीच झाले होते.

मात्र पोलिसांनी कोणतीही खातरजमा न करता गुन्हे दाखल केले. निळवंडेसाठी समितीने व खा. लोखंडे यांनी मोठा संघर्ष केलेला आहे. समितीवर यापूर्वीही गुन्हे दाखल झालेले असून आणखीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी निळवंडे कालव्यांसह पूर्ण करण्याचा संघर्ष सुरू राहणार असल्याची प्रतिक्रीया समितीचे सदस्य व जिल्हा कॉग्रेसचे सचिव श्रीकांत मापारी यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारने आजपर्यंत निळवंडेच्या पन्नास वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेषनात 476 कोटी रुपयांची भरीव तरतूद करुन निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मोठा न्याय देण्याची भूमिका ठेवली आहे. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक अध्यादेश काढून नविन कामे सुरु न करण्याचे आदेश दिले होते. दोन महिन्यापूर्वी ना. थोरात व खा. लोखंडे यांच्याकडे निळवंडे कृती समितीच्या सततच्या पाठपुव्याने सरकारने या अध्यादेशात शिथिलता आणुन काही कामे सुरु करण्यास परवानगी दिली.

मात्र दोन कंत्राटदारांच्या वादात काम बंद पडले होते. निळवंडे पाटपाणी समितीच्या पदाधिकार्‍यांनी ही बाब खा. लोखंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. कालव्याच्या कामाचे महत्व लक्षात घेवून दुपारी दोन वाजता खा. लोखंडे कालव्याच्या कामाच्या साईटवर आले व ज्याला वर्क ऑर्डर आहे. त्याने काम सुरु करण्याच्या सुचना करून काम सुरु केले. त्यावेळी आजुबाजुचे शेतकरीही जमा झाले होते. प्रत्यक्षात काहींनी सकाळीच भूमीपूजन केले होते. त्यामुळे खा. लोखंडेचा कालवा भुमिपुजनाचा प्रश्न नव्हता.

निळवंडे लाभक्षेत्रातील 182 गावे पाण्यावाचून तिन पिढ्या वंचीत आहे. या प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारने मोठी तरतूद केल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या पाणी येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्यामुळेच आता याचे श्रेय हे आपल्याला मिळणार नाही. या आकसापोटी लोणी पोलीस ठाण्यामार्फत खा. सदाशिव लोखंडे सह शेतकर्‍यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहे. यामागील बोलविते धनी वेगळे असून निळवंडे कृती समितीवर यापूर्वीही गुन्हे दाखल झालेले असून आणखीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी निळवंडे कालव्यांसह पूर्ण करण्याचा संघर्ष सुरू राहणार असल्याची प्रतिक्रीया समितीचे सदस्य व जिल्हा कॉग्रेसचे सचिव श्रीकांत मापारी यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com