श्रींगोदा शहरात तरूणाची आत्महत्या

दोन दिवसात दुसरी घटना
File Photo
File Photo

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

शहरातील एका व्यावसायिकाच्या आत्महत्येला (Suicide) दोन दिवस झाले असतांनाच शहरात आज पुन्हा एका तरूणाने आत्महत्या (Youth Suicide) केली आहे. श्रीकांत नवनाथ गोरे (वय 20) या तरुणाने राहत्या घराजवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. मात्र आत्महत्येचे कारण समजले नाही.

दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ओढणीने गळा आवळलेल्या अवस्थेत श्रीकांत या तरूणाचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली. याबाबत अजय अशोक सिदनकर यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर दिली. श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली नमुद दोन्ही प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com