सुरेगावमध्ये अज्ञात महिलेचा खून

डोक्यात मारून, साडीने आवळला गळा
सुरेगावमध्ये अज्ञात महिलेचा खून

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील सुरेगाव (Suregav) शिवारात 30 वर्षीय अज्ञात महिलेच्या डोक्यावर हत्याराने मारुन (The woman was stabbed in the head) अंगावरील साडीचे पदराने तिचा गळा आवळुन गळफास देऊन ठार (Murder) केल्याची घटना घटना शुक्रवार (दिं.7) सायंकाळी उघडकीस आली.

या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेगाव (Suregav) येथील दत्तात्रय संपत रोडे यांच्या जमिनीच्या बांधावर मृतदेह (Corpses) दिसताच सुरेगावचे पोलिस पाटील महादेव तान्हाजी रोडे यांनी पोलिसांना माहिती कळवली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ (Police Inspector Nandkumar Dudhal) यांच्यासह अधिकारी-कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. महिलेच्या डोक्यात हत्याराने वार करून साडीने गळा आवळून जीवे ठार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी (Police) व्यक्त केला आहे. तसेच महिलेची ओळख पटू नये म्हणून महिलेच्या चेहर्यावर केमिकल टाकून चेहरा विद्रूप केला असल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस निरीक्षक दुधाळ यांना तपासाविषई सूचना दिल्या. पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदे येथे पाठविण्यात आला असून खुनातील मारेकर्यांना शोधण्याचे मोठे आव्हान बेलवंडी पोलिसांपुढे उभे राहिले आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात पोलिस पाटील महादेव तान्हाजी रोडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.