करोना नियमांचं उल्लंघन, बेशिस्तांकडून १५ लाखांचा दंड वसूल

करोना नियमांचं उल्लंघन, बेशिस्तांकडून १५ लाखांचा दंड वसूल

श्रीगोंदा | प्रतिनिधी

करोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स, स्वच्छता या त्रिसूत्रीसह वेळेचे बंधन, संचारबंदी, जमावबंदीचे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र काही नागरिक याकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याने करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्यांकडून बेलवंडी पोलिसांनी कडक कारवाई करत १ फेब्रुवारी ते १७ मे या ४ महिन्याच्या कालावधीत १५ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिली.

करोनाचा प्रादुर्भाव राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत चालला असल्याने शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केले असताना देखील नागरिक मोठ्या प्रमाणात विनाकारण फिरत आहेत. विनापरवाना इतर जिल्ह्यातून येणारे वाहन चालक, वाहनांमध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त व्यक्ती, मास्क न वापरणारे, सोशल डीस्टन्स न पाळणारे यांच्यावर बेलवंडी पोलीसांनी १ फेब्रुवारी ते १७ मे या कालावधीत दंडात्मक कारवाई करत सुमारे १५ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला.

तसेच अहमदनगर पुणे महामार्गावर गव्हाणवाडी येथे अंतरजिल्हा चेकपोस्ट लावून वाहने चेक करून विनापरवाना इतर जिल्ह्यातून येणारे वाहन चालक यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिली.

ही कार्यवाही पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, श्रीगोंदा पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पप्रकाश बोराडे, पोलिस कर्मचारी हसन शेख, पो.ना. संतोष गोमसाळे, ज्ञानेश्वर पठारे, म.पो.काँ. शोभा काळे, संपत गुंड, बजरंग गवळी, मारूती कोळपे, संदिप दिवटे, रावसाहेब शिंदे, विकास करखीले, होमगार्ड यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com